पाच फायदेशीर बेस्ट योजना 5 Best Yojana

पाच फायदेशीर बेस्ट योजना मित्रांनो आज आपण अश्या पाच योजना जाणून घेणार आहोत. आपण या घेतल्या का? एकदा बघून घ्या कारण सरकारच्या या पाच योजना आपण घेतल्याच पाहिजेत. हो पण या योजनेत आपण पात्र आहोत का? हे मात्र जाणून घेतलेच पाहिजे या करता आमच्या पेज वर रोज अपडेट रहाल तर रोजच्या रोज आपण अश्या योजनेबद्दल माहिती मिळवू शकता.

आज आपण अश्या योजना बघणार तर आहोतच पण. ऑनलाईन पद्धतीने आपण ही योजना कशी घ्याल हे ही पाहणार आहोत.

पाच फायदेशीर बेस्ट योजना 5 Best Yojana

चला तर बघूया या पाच योजना कोणत्या आहेत.

📂 रेशन कार्ड

होय रेशन कार्ड हे असे एकमेव कार्ड आहे की या द्वारे आपल्याला राज्य सरकार कडून अन्नाचा पुरवठा अगदी अल्प दरात केला जातो. रेशनकार्ड हे राज्य सरकारने जारी केलेले एक दस्तऐवज आहे जे ओळखीचा पुरावा म्हणून ही काम करते आणि एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती दर्शवते. हा एक दस्तऐवज आहे जो एखाद्या व्यक्तीला कार्ड धारकांना प्रदान केलेल्या विविध सरकारी लाभाचा लाभ घेण्यास मदत करतो. आज ₹ २ ते ₹३ रुपयांत आपल्याला रेशनकार्ड द्वारे धान्य मिळतं असते. परंतु या रक्कमेत लाभ घेण्यासाठी तुमच्या कडे रेशनकार्ड हवेच.

तुम्हाला माहित आहे का? आपल्या भारतात एकूण पाच प्रकारचे रेशनकार्ड मिळतात?
🤔

राज्य सरकार लोकांचे वर्गीकरण करते आणि वेगवेगळ्या श्रेणी नुसार वेगवेगळी रेशन कार्ड देऊ करते.

📃प्राधान्य कुटुंब (PHH) शिधापत्रिका
📃अंत्योदय अन्न योजना (AAY) शिधापत्रिका
📃एपीएल APL (दारिद्रय रेषेच्या वर) शिधापत्रिका
📃बीपीएल BPL(दारिद्रय रेषेखालील) शिधापत्रिका
📃अन्नपूर्णा योजना (AY) शिधापत्रिका

📌 कृपया लक्षात घ्या की एपीएल, बीपीएल आणि एवाय शिधापत्रिका यापुढे भारतात जारी केली जाणार नाहीत. सध्या, NFSA अंतर्गत फक्त PPH आणि AAY कार्ड जारी केले जाणार आहे.

📎 रेशनकार्ड कसे काढावं?

रेशनकार्ड काढण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईट वर भेट द्यावी लागेल.
इथं गेल्यानंतर आपलं स्वतःचे अकाऊंट बनवून घ्या. अकाऊंट तयार झाले की साईन अप करा आपल्या समोर रेशनकार्ड करता फॉर्म ओपन होईल. आवश्यक बाबी वेवस्थीत भरून आपल्या जवळील तसशीलदार ऑफिसला आवश्यक कागदपत्रांसहित तो जमा करा. ३० दिवसांच्या कालावधीनंतर तुमचे रेशनकार्ड मिळेल. अश्या प्रकारे रेशनकार्ड चा फायदा घेऊ शकता.

लिंक साठी येथे क्लिक करा

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

📂 आयुष्मान भारत कार्ड

पाच फायदेशीर बेस्ट योजना 5 Best Yojana

मित्रांनो आजच्या धावपळीच्या जीवनात मेडीकल एमरजेन्सी कुणावरही येऊ शकते. या करता आयुष्यमान भारत कार्ड आपल्या जवळ असनं आवश्यक आहे. केंद्र सरकारने आणलेल्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ आज सर्वांना होताना दिसत आहे. आपल्या घरात कुणाला मोठा आजार आहे. आणि कमी पैश्या अभावी उपचार करू शकत नसाल तर हे कार्ड आपल्या करता फायदेशीर ठरते. आपल्याला पाच लाख रुपये पर्यंतची यात मदत मिळते महाराष्ट्र राज्य सरकारने यात महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना देखील यात एकत्रित केली असून आता हेच कार्ड आपल्याला ७.५० लाख रुपये पर्यंतचा फायदा करून देणार आहे.

पाच फायदेशीर बेस्ट योजना 5 Best Yojana

📎 आयुष्यमान भारत कार्ड कसं काढावं?

आपल्या जवळील सी एस सी सेंटर, किंवा जवळच्या सरकारी दवाखान्यात हे कार्ड काढू शकता. परंतु लक्षात घ्या २०११ च्या जणगणने नुसार सर्व निकष पूर्ण अल्यास जाहीर झालेल्या आयुष्मान भारत यादीत आपलं नाव असणं गरजेचं आहे. नावा करता आपण आपके द्वार या वेबसाईटवर जाऊन मोबाईल नंबर टाकून ओटीपी पडताळून. आपल्या गावाची यादी पाहू शकता आपले नाव यादीत असणं गरजेचं आहे.

📌आपल्या कडे खालील कागदपत्रे असणं गरजेचं आहे


📃Ration Card, UID Aadhar Card, PM Latter

परंतु महाराष्ट्र सरकार या पुढे सर्वांकरता हे कार्ड उपलब्ध करून देणार आहे. परंतु याला ही काही नियम असतील.
अश्या प्रकारे आपण हे कार्ड काढू शकता. तर मग आजच नाव यादीत पाहू आपले कार्ड काढून घ्या.

या योजनेत आपले नाव पाहण्यासाठी आपण येथे क्लिक करा

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

📂आभा कार्ड / हेल्थ कार्ड

मित्रांनो पुढचे आणि तिसरे आपल्या जवळ जे कार्ड हवे ते आहे ” आभा कार्ड ” बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की ” आयुष्मान भारत ” कार्ड म्हणजे..! तर असे नाही आभा कार्ड पूर्ण पणे वेगळे असून. आरोग्य विभाग आजच्या डिजिटलाझेशन कडे वळत आहे. लोकांकरिता हे कार्ड का? महत्वाचे आहे आपण जाणून घेऊयात.
आपणाला माहित आहे मोठ्या दवाखान्यात गेल्यानंतर भर गर्दीत, गडबडीत केस पेपर काढणं, ओ पी डी रेजीस्ट्रेशन करणं या बरोबर पेशंटला संभाळन किती महत्वाचे आहे. हे कार्ड असल्याने हीच कामं सोप्पी होणार आहे. आपण या द्वारे एका मिनिटात ओ पी डी रेजीस्ट्रेशन करू शकता. या सोबत आपण ट्रिटमेंट घेत असलेल्या डॉक्टर व डॉक्टर ने दिलेली औषधे यांचा सर्व डेटा सांभाळण्याचं काम हे कार्ड करणार आहे.

📎आभा कार्ड कसे काढावं?

📌हे कार्ड  Aysuhman Bharat digital Mission योजने अतंर्गत लॉन्च करण्यात आले आहे.

कार्ड काढण्यासाठी तुमच्या जवळ फक्त आधार कार्डशी लिंक असेलला

📃 मोबाईल नंबर
📃 आधारकार्ड
या महत्वाच्या दोन गोष्टी आभा कार्ड काढण्यासाठी लागतील, आपण मोबईल द्वारे स्वतः ही हे कार्ड काढू शकता. कार्ड काढल्या नंतर तुम्हाला १२ अंकी युनिक नंबर मिळेल या नंबरने तुमच्या आरोग्याची सर्व माहिती या कार्ड द्वारे नोंदवली जाईल.

या योजनेत सहभाग घेण्यासाठी येथे क्लिक करा

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

📂 लेबर कार्ड

मित्रांनो पुढील चौथी सेवा ही “लेबर कार्ड” सेवा आहे, कोरोणा संसर्ग काळात ज्यांच्या कडे लेबर कार्ड होते यांना सरकारने प्रती ५०००₹ रुपये मदत केली होती ज्यांच्या कडे हे कार्ड होते.
या व्यतिरिक्त या कार्डचा उपयोग हा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च कमी करण्यासाठी तसेच मुलीच्या लग्ना करता या द्वारे पैसे मिळतात व एखादी मेडिकल एमरजेन्सी आलीच तर या कार्ड द्वारे काही रक्कम ही मिळते.

📎लेबर कार्ड कसे काढावं?

📌हे कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा 

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

वरील वेब पेज वर जाऊन साइन इन करा. आपल्या नावे अकाऊंट तयार करा. अकाऊंट तयार झाल्यावर आवश्यक सर्व माहिती भरा भरून सबमिट करा.
सबमिट केल्यावर सर्व डॉक्युमेंट घेऊन लेबर डिपार्टमेंट कडे जा डॉक्युमेंट वेरीफिकेशन झाल्यावर आपलं लेबर कार्ड बनलेल असेल.

📂 किसान क्रेडीट कार्ड KKC

kISAN cREDIT CARD

आपण पाहत असलेल्या योजनांपैकी शेवटची पाचवी महत्व पूर्ण योजना म्हणजे ” किसान क्रेडीट कार्ड ” शेतकरी परिवारातून येत असाल तर ही योजना आपल्या करता आहे.

आपल्या शेती करिता जर आपणाला लोन ची गरज असेल तर या योजनेत आपण नक्की सहभाग घ्यायला हवा.

आपण 3 ते ४ लाख रुपयाचा लोन ४ % व्याजदराने या क्रेडीट कार्ड द्वारे मिळत असतो

📎किसान क्रेडीट कार्ड कसे काढावं?

आपल्या जवळील ग्रामीण बँकेत भेट द्यावी लागेल, तिथे गेल्या नंतर आवशक कागदपत्रे जसे की ७/१२ , त्या बँकेतील आपले पासबुक, आधार कार्ड घेऊन जावे. बँके द्वारे सर्व कागदपत्र पडताळणी योग्य रित्या झाली की याच बँकेतून तुम्हाला किसान क्रेडीट कार्ड मिळते.

📌महत्वाचे फायदे कार्ड ची लिमिट 3 ते ४ लाख रुपये आपण कोणत्या ही वेळी ही रक्कम लोन मध्ये convert करू शकता.
📌 लोन ची ई एम आय वेळेत भरली तर इंटरेस रेट कमी होतो. याचा आपण फायदा घेऊ शकता.

Conclusion

मित्रांनो ,

ह्या पोस्ट मध्ये आम्ही पाच फायदेशीर बेस्ट योजना 5 Best Yojana याची माहिती दिली आहे , मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत नक्की शेअर कराल .

धन्यवाद !! 🙏🏻

2 thoughts on “पाच फायदेशीर बेस्ट योजना 5 Best Yojana”

  1. Pingback: नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना कर्जमाफी - cscKatta

  2. Pingback: सलोखा योजना - cscKatta

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top