सलोखा योजना

सलोखा योजना Salokha Yojana२०२३

सलोखा योजना Salokha Yojana२०२३ शेत जागा जमिनीचे वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारनं आता (Salokha Yojana) आणली आहे. ही योजना नेमकी काय? याचा काय फायदा होणार याबाबतची माहिती पाहुयात.

सलोखा योजना Salokha Yojana२०२३ मित्रांनो शेतकऱ्यांच्या दृष्टीनं शेत जागा जमिनीचे वाद हे काही नवे नाहीत.

गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीच्याभांडणं,वादामुळं काही शेतकरी कोर्ट-कचेरीत फेऱ्या मारत आहेत

वाढत्या औद्योगीकरणामुळं, वाढते रस्ते हायवे, मोठमोठाले टॉवर ,बिल्डींग , शहरीकरणामुळं शेत जमिनींना मागणी वाढली.

शहराच्या जवळ असलेल्या जमिनीला तर सोन्यासारखा दर मिळू लागला. यामुळे आप आपसात भावकीत, शेजार पाजाऱ्यात भांडण तंटे वाढत गेले.

मात्र, वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारनं आता ‘सलोखा योजना’ (Salokha Yojana) आणली आहे.

योजनेच्या माध्यमातून एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र रु.

1000/- व नोंदणी फी नाममात्र रु. 1000 आकारून योजना राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

यासाठी सवलतीत मुद्रांक शुल्क नाममात्र एक हजार रुपये आणि नोंदणी फी 100 रुपये आकारण्यात येईल

अशी माहिती सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे. झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने या योजनेस मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात एकूण जमिनधारकांची खातेसंख्या 3 कोटी 37 लाख 88 हजार 253 एवढी आहे. तर एकूण वहिवाटदार शेतकरी 1 कोटी 52 लाख इतके आहेत.

शेत जमिनीच्या ताब्यासंदर्भात एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या सुमारे 13 लाख 28 हजार 340 इतकी आहे.

सलोखा योजनेत अर्ज केल्यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी 15 दिवसात पंचनामा करणे आवश्यक असल्याची माहिती देखील राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे.

शेत जमिनीवरुवन भाऊबंदकीमध्ये मोठे वाद निर्माण होतात. काही वेळेला हे वाद आपापसात काही मिटू शकत नाहीत.कधी कधी हे वाद खूप टोकाला जातात

त्यातून मग हत्येसारखे प्रकार देखील घडतात, त्यामुळं आता यावर उपाय म्हणून शासनाकडून ही योजना राबवली जाणार आहे.

तब्बल 50 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा वाद यामुळे मिटेल अशी आशा शासनाने व्यक्त केली जात आहे.

सलोखा योजना Salokha Yojana२०२३

📍 सलोखा योजनेचे फायदे 📍
राज्य सरकारने सलोखा योजनेस मान्यता दिली खरी पण याचा नेमका काय फायदा होणार असा सर्वांना प्रश्न पडला असेलच. तर या योजनेमुळं शेतकऱ्यांना विविध फायदे होणार आहेत. याबाबतची सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे.

या योजनेमुळं शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण होईल.
विविध न्यायालयातील प्रकरणे लवकर निकाली लागतील.

या योजनेमुळं भूमाफीयांचा अनावश्यक हस्तक्षेप सुद्धा होणार नाही.
  1. जमिनीवरून मतभेद असलेल्या कुटुंबांमधील आप आपसातील जमिनीसंबंधीचा वाद मिटवला जाईल.
  2. जमिनीशी संबंधित अनेक प्रलंबित प्रकरणे निकाली लावली जातील.
  3. जमिनीच्या वादामुळे कुटुंबातील कटुता हिंसकता दूर होईल.
  4. अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल.
  5. या योजनेंतर्गत सरकारला मुद्रांक शुल्क मिळेल.
  6. योजनेंतर्गत जमिनीशी संबंधित वाद मिटल्यास शेतकऱ्यांना लवादाकडे जावे लागणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होईल.
  7. भूमाफियांची घुसखोरी किंवा इतरांचा हस्तक्षेप यात होणार नाही.

तर मित्रांनो कशी वाटली माहिती नक्की वाचा

Conclusion

मित्रांनो ,

ह्या पोस्ट मध्ये आम्ही सलोखा योजना Salokha Yojana २०२३ याची माहिती दिली आहे , मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत नक्की शेअर कराल .

धन्यवाद !! 🙏🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top